IPL 2022 : मेगा लिलावापूर्वीच सनरायझर्स हैद्राबादमध्ये 'हे' दिग्गज

IPL 2022 : मेगा लिलावापूर्वीच सनरायझर्स हैद्राबादमध्ये 'हे' दिग्गज

हैद्राबाद | Hyderabad

आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धेचा १५ वा हंगाम सुरु होण्यासाठी केवळ ३ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मुख्य स्पर्धा २ एप्रिलपासून सुरु होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे...

आयपीएल २०२१ मध्ये साखळीतच गाशा गुंडाळणाऱ्या सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाने फेब्रुवारीत बंगळुरू (Bangalore) येथे होणाऱ्या आयपीएलच्या (IPL) मेगा लिलावाच्या (Mega Auction) पार्श्वभूमीवर आपल्या संघात महत्वपूर्ण बदल केले आहेत. संघाने क्रिकेटमधील (Cricket) माजी ३ दिग्गज खेळाडूंना काही महत्वपूर्ण जवाबदाऱ्या सोपवल्या आहेत.

वेस्टइंडीज (West Indies) क्रिकेट संघाचा माजी डावखुरा फलंदाज ब्रायन लाराकडे (Brian Lara) धोरणात्मक फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) माजी तेज गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) याची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

संघाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मुडी (Tom Moody) तर सहाय्यक प्रशिक्षक सायमन कॅटीच (Simon Katich) असणार आहेत. तर क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून भारताचे (India) माजी क्षेत्रक्षक आणि डावखुरे मधल्या फळीतील फलंदाज हेमंग बदानी (Hemang Badani) आणि श्रीलंकेचा (Sri Lanka) माजी फिरकीचा गोलंदाज मुथैया मुरलीधरन (muthaiya muralitharan) फिरकी गोलंदाजीच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. याशिवाय तो संघाची रणनीती ठरवण्याचेही काम चोख पार पाडतो.

२०२१ च्या हंगामात १४ सामन्यांमध्ये ११ पराभव आणि ३ विजय अशी निराशाजक कामगिरी केल्यानंतर हैद्राबाद संघाने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात डेविड वॉर्नरचे (David Warner) नेतृत्व काढून घेऊन स्पर्धेच्या उत्तरार्धात केन विलियम्सनकडे (Kane Williamson) सोपवले होते. मात्र त्याला आपल्या नेतृत्वात कमाल करून दाखवता आली नव्हती. हा निराशाजनक हंगाम संपल्यानंतर रशीद खान (Rashid Khan) आणि डेविड वॉर्नर यांनी हैद्राबाद संघाची साथ सोडली आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com