IPL 2022 : बाद फेरीच्या सामन्यांसाठी 'अशी' आहे नियमावली

IPL 2022 : बाद फेरीच्या सामन्यांसाठी 'अशी' आहे नियमावली

मुंबई । Mumbai

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये बाद फेरीच्या सामन्यांना आज मंगळवारपासून कोलकाताच्या ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने (BCCI) आयपीएल २०२२ बाद फेरीच्या सामन्यांसंदर्भात एक नवीन नियमावली जाहीर केली आहे. बाद फेरीचे सामने कोलकाता आणि अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहेत. (Eden Gardens Cricket Stadium)

या सर्व सामन्यांवर पावसाचे सावट असल्याने बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, बाद फेरीच्या (Playoff matches) सामन्यांदरम्यान जर पाऊस (RAIN) आला. तर सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये (Super over) निश्चित केला जाईल.

तसेच मैदानावरील परिस्थिती पाहून जर सामना खेळवणे अशक्य असल्यास सामन्याचा निकाल आयपीएल गुणतालिकेत (IPL Points Table) साखळी फेरीत गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या संघाला विजेता घोषित करण्यात येईल.

तर २९ मे रोजी अंतिम सामन्याच्या दिवशी पावसाचा व्यत्यय आल्यास सामना ज्या स्कोरवर थांबण्यात आला असेल. तेथूनच राखीव दिवशी पुन्हा एकदा सुरु करण्यात येईल.तसेच अंतिम सामना ८ वाजता खेळवण्यात येणार असून अंतिम सामन्यासाठी ३० मे हा राखीव दिवस असणार आहे.

तसेच पावसाच्या व्यत्ययामुळे (Rain disruption) निश्चित वेळेत सामना सुरु होऊ शकला नाही. तर त्यासाठी वेगळा राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. यामध्ये अडीच तासाची भर घालण्यात आली आहे. बाद फेरीचे सामने ९:४० वाजता खेळवले जाण्याची शक्यता आहे. तसेच अंतिम सामना १०:१० ला सुरु होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बाद फेरीचे सामने हे २० षटकांचे होणार असून यामध्ये दोन स्टॅटेजीक टाइम आऊट असणार आहेत. तसेच क्वालिफायर आणि एलिमिनेटरचा (Qualifiers and Eliminators) पहिला डाव संपल्यावर दुसऱ्या डावात पावसाचा व्यत्यय आल्यास सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार (Duckworth-Lewis rule) घेण्यात येणार आहे. तर अंतिम सामन्याच्या दिवशी नाणेफेकी दरम्यान पाऊस आला तर दुसऱ्या दिवशी नव्याने नाणेफेक करण्यात येईल.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com