IPL 2022 : उद्या होणाऱ्या दिल्ली-पंजाब यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलले... कुठे होणार सामना?

IPL 2022 : उद्या होणाऱ्या दिल्ली-पंजाब यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलले... कुठे होणार सामना?

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2022 च्या मोसमात करोनाने (COVID19) पुन्हा एकदा शिरकाव केला आहे.

दिल्ली संघाशी (Delhi Capitals) संबधित पाच जणांना करोनाची लागण झाली असून यात परदेशी खेळाडूचाही समावेश आहे. याच कारणामुळे खबरदारी म्हणून बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे.

उद्या (२० एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स (Delhi Capitals vs Punjab Kings) संघात सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे (MCA Stadium) येथे होणार होता. पण, हा सामना उद्या (२० एप्रिल) होणार आहे, पण पुण्यात न खेळवता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Related Stories

No stories found.