ठरलं! 'या' दिवशी होणार आयपीएलचा मेगा लिलाव

ठरलं! 'या' दिवशी होणार आयपीएलचा मेगा लिलाव

बंगळूर | Bangalore

आयपीएल २०२२ चा (IPL 2022) १५ व्या हंगामाचा मेगा लिलाव (Mega Auction) येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळूर (Bangalore) येथे होणार आहे. आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांनी स्वतः माहिती दिली आहे...

यंदाच्या हंगामात अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनौ (Lucknow) हे दोन नवीन संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आयपीएल लिलावापूर्वी दोन्ही संघांना एकूण ३-३ खेळाडू आपल्या संघात विकत घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यासाठी दोन्ही नवीन संघांना दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दोन्ही संघ पुढील आठवड्यात आपले ३ खेळाडू फायनल करतील अशी सूत्रांची माहिती आहे. आता आयपीएल २०२२ पासून विवो आयपीएलचे टायटल स्पॉन्सर नसतील. त्याच्याजागी टाटा आयपीएल (Tata IPL) असे नाव आयपीएलपुढे (IPL) जोडले जाईल.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com