IPL-2022 : बंगळुरूचा राजस्थानवर विजय

IPL-2022 : बंगळुरूचा राजस्थानवर विजय

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

वानखेडे स्टेडियमच्या (Wankhede Stadium )खेळपट्टीवर खोर्‍याने धावा करणे सोपे नाही, हे राजस्थान रॉयल्सच्या इनिंग्जमधून समोर आले. मागील सामन्यात ६८ धावांत शतक कुटणारा जोस बटलरही येथे संघर्ष करताना दिसला. पण, त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (Royal Challengers Bangalore )गोलंदाजांचा शेवटपर्यंत सामना केला. देवदत्त पडिक्कल व शिमरोन हेटमायर यांची त्याला साजेशी साथ मिळाली. बटलर, पडिक्कल व हेटमायर या तिघांच्याही दमदार खेळीने राजस्थानला ( Rajasthan Royals ) आरसीबीपुढे ( Royal Challengers Bangalore ) १७० धावांचे आव्हान ठेवले.

प्रथम फलंदाजी करणार्‍या राजस्थान रॉयल्सची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. यशस्वी जैस्वाल (४) दुसर्‍याच षटकात त्रिफळाचीत झाला. डेव्हिड विलीने ही विकेट मिळवून दिल्यानंतर बंगळुरूला सामन्यावर पकड घेता आली असती. पण, त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी बटलर व पडिक्कल यांचे सोपे झेल सोडले. या जोडीने मग ४९ चेंडूत ७० धावांची भागीदारी करून राजस्थानला सावरले. हर्षल पटेलने ही जोडी तोडली. १०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पडिक्कलने मारलेला चेंडू हवेत उंच झेपावला आणि विराटने सुरेखरित्या तो टिपला.

देवदत्त २९ चेंडूत २ चौकार व २ षटकार खेचून माघारी परतला. बटलर एका बाजूने खिंड लढवत होता. त्याने आयपीएलमध्ये १०० षटकार मारण्याचा विक्रम या सामन्यात पूर्ण केला. संजू सॅमसन (८) हसरंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. हेटमायरने सलामीवीर बटलरला चांगली साथ दिली. १९व्या षटकात मोहम्मदला दोन सलग षटकार खेचून बटलरने अर्धशतक पूर्ण केले.

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या १७० धावांचे आवाहन पार करताना सलामीला फलंदाजीस आलेल्या डूप्लेसी ने दमदार धुलाई करण्यास सुरवात केली. डूप्लेसी` ने पाच चौकार झळकवत आक्रमक खेळी केली. २० चेंडूत २९ धावा करीत डूप्लेसीला बोल्ट ने झेलबाद केले. अनुज रावत ने २५ चेंडूत २६ धावा केल्या.

शाहबाज अहमद ने चार चौकार झळकवत २६ चेंडूत ४५ धावा केल्या आणि दिनेश कार्तिकने २३ चेंडूत नाबाद ४४ धावा करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने राजस्थान रॉयल्सवर चार विकेट राखून विजय मिळवला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com