आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव फेब्रुवारीत?

आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव फेब्रुवारीत?
आयपीएल

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या १५ व्या हंगामाचा लिलाव (Auction) फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे . हा लिलाव किमान २ दिवस चालण्याची शक्यता आहे. लिलावाचे आयोजन बंगळूर (Bangalore) किंवा हैद्राबाद (Hyderabad) येथे होण्याची शक्यता आहे....

यंदाचा हा लिलाव लखनौ (Lucknow) आणि अहमदाबाद (Ahmadabad) या दोन नवीन संघासह पार पडणार आहे. बीसीसीआय दोन्ही संघाना स्पर्धेच्या नवीन हंगामासाठी नव्यानं संघाची बांधणी करण्याची संधी उपलब्ध करून देईल. बीसीसीआय सध्या सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सच्या स्वीकृत स्थितीवर चर्चा करीत आहे. या कंपनीने अहमदाबाद संघाची मालकी स्वतःकडे घेतल्यांनंतर एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

सीव्हीसी कॅपिटलने (CVC Capital) अहमदाबाद संघासाठी अदानी समूहाला मागे टाकण्यासाठी ५,६०० कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावली. पण सट्टेबाजी कंपन्यांशी सीव्हीसीच्या संबंधांमुळे बीसीसीआयवर (BCCI) मोठ्या प्रमाणावर टीकांचा वर्षावही करण्यात आला. दरम्यान, लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांसाठी १ डिसेंबर २०२१ पासून आयपीएल प्लेयर रिटेन्शनची विंडो सुरु करण्यात आली आहे.

मुख्य लिलाव प्रक्रिया पार पडण्यापूर्वी दोन्ही संघाना आपल्या सॅलरी पर्समधून किमान ३३ कोटी इतकी रक्कम खर्च करून ३ खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यासाठी पहिल्या खेळाडूसाठी किमान १५, दुसऱ्या खेळाडूला ११ कोटी तिसऱ्या खेळाडूसाठी ७ कोटी इतकं शुल्क आकारण्याची परवानगी असणार आहे. या ३ खेळाडूंमध्ये २ भारतीय १ परदेशी खेळाडू असणं बंधनकारक असणार आहे.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com