IPL 2021 : आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, कोणाचं पारडं जड?

IPL 2021 : आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, कोणाचं पारडं जड?

मुंबई l Mumbai

आयपीएलच्या १४व्या हंगामात मंगळवारी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे.

दिल्ली आणि मुंबई या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत प्रत्येकी ३ सामने खेळले आहेत आणि प्रत्येकी २ सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत दिल्ली तिसर्‍या, तर मुंबई चौथ्या क्रमांकावर आहेत. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्स विजेते तर दिल्ली कॅपिटल्स उपविजेते राहिले होते.

मुंबई संघात सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ क्रुणाल असे खेळाडू आहेत, जे कोणत्याही संघाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करण्यास सक्षम आहेत. मात्र, त्यांना अद्याप चमकदार कामगिरी करता आलेली नाही. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट डेथ ओवरमध्ये मुंबईला विजय मिळवून देत आहेत. त्यांच्याखेरीज राहुल चहर फिरकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या सर्वांच्या योगदानामुळे मुंबईने क्रमश: १५० आणि १५२ धावांचा बचाव केला होता.

तसेच मुंबईने आरसीबी विरुद्धची पहिली लढत गमावली होती.पण त्यानंतर दोन लढतीत कमी धावसंख्या केल्यावर देखील त्यांनी विजय मिळवला. रोहित शर्मा आणि क्विंटन यांनी चांगली सुरूवात करून नंतर मोठी धावसंख्या करण्यात मुंबईला यश आले नाही. या सामन्यात त्यांना मोठी धावसंख्या करावी लागेल यासाठी मधळ्याफळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागले.

दुसरीकडे, दिल्लीकडून पृथ्वी शॉ सोबत शिखर धवन ही आक्रमक जोडी फॉर्ममध्ये आहे. धवनने आतापर्यंत १८६ धावा केल्या आहेत. दिल्लीने गेल्या लढतीत स्टीव्ह स्मिथला खेळवले होते. आता चेपॉकवर पुन्हा अजिंक्य रहाणेला संधी दिली जाऊ शकते. गोलंदाजीत कगिसो रबाडा आणि ख्रिस वोक्स यांनी दमदार कामगिरी केली आहे. एनरिक नोर्त्जे हा पर्याय त्यांच्याकडे आहे. नॉर्कियाही त्यांच्यासाठी अतिरिक्त पर्याय आहे.

संभाव्य संघ

दिल्ली कॅपिटल्स

ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव स्मिथ/अजिंक्य रहाणे, कगिसो रबादा, एनरिच नॉर्टजे, आवेश खान, ललित यादव, लुकमान हुसैन मेरिवाला, मार्कस स्टोइनिस आणि रविचंद्रन अश्विन.

मुंबई इंडियंस

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, ईशान किशन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, एडम मिलने आणि ट्रेंट बोल्ट.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com