IPL 2021 मध्ये पुन्हा करोनाचा शिरकाव; 'या' संघातील महत्त्वाचा खेळाडू बाधित

IPL 2021 मध्ये पुन्हा करोनाचा शिरकाव; 'या' संघातील महत्त्वाचा खेळाडू बाधित

दिल्ली | Delhi

इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या (IPL 2021) हंगामाचा दुसरा टप्पा सध्या संयुक्त अरब अमिरातीत (UAE) सुरू आहे.

आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यातील ३ सामने पार पडले असून चौथा आणि संपूर्ण हंगामातील ३३ वा सामना बुधवारी (२२ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad) यांच्यात होणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) गोलंदाज टी नटराजनला करोनाची लागण (T Natarajan tested positive for COVID19) झाली आहे. आरटीपीसीआर चाचणी (RT-PCR test) केली असता टी नटराजनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आयपीएलने (IPL) दिली आहे. टी नटराजनला (T Natarajan) करोनाची कोणतीही लक्षणं जाणवत नसून सध्या इतर सहकाऱ्यांपासून अंतर ठेवत विलगीकरणात आहे. हे सर्वजण टी-नटराजनच्या संपर्कात आले होते अशी माहिती देण्यात आली आहे.

विजयबरोबर नटराजनच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये टीम मॅनेजर विजय कुमार, फिजिओ शाम सुंदर जे, डॉक्टर अंजना वनन, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर आणि नेट बॉलर पेरियासामी गणेशन यांचा समावेश आहे.

दरम्यान आज सनराईजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यावर आता बीसीसीआय अंतिम निर्णय घेणार आहे.

Related Stories

No stories found.