IPL 2021 : आज RR विरुद्ध PBKS, कोणाचे पारडे जड?

IPL 2021 : आज RR विरुद्ध PBKS, कोणाचे पारडे जड?

मुंबई | Mumbai

आयपीएलच्या (IPL2021) चौदाव्या हंगामातील चौथा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात आज खेळला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium Mumbai) हा सामना खेळला जाणार आहे. केएल राहुलकडे पंजाबचं नेतृत्व आहे, तर संजू सॅमसनकडे राजस्थान रॉयल्सची कमान सोपवण्यात आली आहे.

राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व पहिल्यांदाच संजू सॅमसनकडे देण्यात आलं आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात संघात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर खेळणार नाही. तर जोस बटलर आणि बेन स्टोक्सकडून संघाला खूप अपेक्षा आहेत. त्याचबरोबर सर्वात जास्त किंमत मोजून घेतलेल्या ख्रिस मॉरिसकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. असं असलं तरी मधल्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

पंजाब किंग्सकडे आक्रमक फलंदाजांचा ताफा असून ही जमेची बाजू आहे. त्यामुळे पहिल्या चेंडुपासून राजस्थान रॉयल्सवर हावी होण्याचा पंजाबचा प्रयत्न असणार आहे. इतर संघाच्या तुलनेत पंजाब संघात सर्वाधिक विदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे अंतिम ११ मध्ये निवड करताना दमछाक होणार आहे. सलामीवीर म्हणून कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल हे फलंदाज दिसतील. गेल्या वर्षी पंजाबने ख्रिस गेलला सुरुवातीच्या काही सामन्यात संधी दिली नव्हती. त्याचा फटका पंजाबला बसला होता. या वर्षी हीच चुक पंजाब पुन्हा करणार नाही.

आयपीएलच्या मागच्या पर्वात राजस्थान रॉयल्सची निराशाजनक कामगिरी होती. त्यामुळे राजस्थानचा संघ सर्वात शेवटी अर्थात आठव्या स्थानावर गुणतालिकेत फेकला गेला होता. एकूण १४ सामन्यांपैकी ८ सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला होता.

तर पंजाब किंग्सची कामगिरीही सुमारच राहिली. गुणतालिकेत सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. एकूण १४ सामन्यांपैकी ८ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यंदा दोन्ही संघ चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतील.

कसा असेल संभाव्य संघ

राजस्थान रॉयल्स-

जोस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन (कर्णधार), रेयान पराग, शिवम दुबे, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, लियाम लिव्हिगस्टोन, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी

पंजाब किंग्ज

केएल राहुल (कर्णधार), मयांक अग्रवाल, ख्रिस गेल/डेव्हिड मलान, प्रभसिमरन सिंह, निकोलस पूरन, शाहरुख खान, दीपक हुडा, झाय रिचर्डसन, रिली मारादीथ, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com