IPL-2021 : राजस्थानचा पंजाबवर विजय

IPL-2021 : राजस्थानचा पंजाबवर विजय

दुबई | वृत्तसंस्था Dubai

आज राजस्थान रॉयल्स Rajasthan Royals आणि पंजाब किंग्ज इलेव्हन Punjab Kings XI यांच्यात खेळल्या गेलेल्या IPLच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्ज इलेव्हन वर विजय मिळवला.

पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सच्या सलामीवीर यशस्वी जयस्वालने आक्रमक सुरुवात करत एव्हिन लुईसनेच्या समवेत या दोघांनी पाचव्या षटकातच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले.

लुईसला अर्शदीप सिंगने ३६ धावांवर बाद केले. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनही ४ धावा बाद झाला .लिव्हिंगस्टोनने १७ चेंडूत २५ धावांची आक्रमक खेळी केली. अर्शदीप सिंगने त्याला बाराव्या व्या षटकात बाद केले. यशस्वी जयस्वाल अर्धशतकाजवळ पोहचत असतानाच हरदीप ब्रारने त्याला ४९ धावांवर बाद केले.

महिपाल लोमरोरने आक्रमक फलंदाजी करत राजस्थानला १५० च्या पार पोहचवले. लोमरोर १७ चेंडूत ४३ धावा करुन बाद झाला. राजस्थान रॉयल्स ने १८५ धावा करीत १८६ धावांचे लक्ष पंजाब किंग्ज इलेव्हन संघापुढे ठेवले .

राजस्थानच्या दिलेल्या १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मयंक अग्रवाल आणि कर्णधार केएल राहुल यांनी पंजाबसाठी चांगली कामगिरी केली. या दोघांनी पहिल्या ४१ धावा केल्या . सातव्या षटकात पंजाबने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर मयंकने आक्रमक पवित्रा धारण करत राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

१०व्या षटकात मयंकने मॉरिसला षटकार खेचत ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात पंजाबचे शतक फलकावर लागले. चेतन साकारियाने पंजाबचा कर्णधार केएल राहुलला ४९ धावांवर बाद केले .

राहुलने आपल्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार ठोकले. मयंक-राहुल यांनी १२० धावा केल्या . राहुलनंतर मयंकही तंबूत परतला. मयंकने ७ चौकार आणि २ षटकारांसह ६७ धावा केल्या.

शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी ४ धावांची गरज असताना कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर पूरन ३२ धावांवर बाद झाला. शेवटच्या षटकात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर पंजाबला २० षटकात १८3 धावाच करता आल्या आणि राजस्थानने आपला विजय साजरा केला.

Related Stories

No stories found.