IPL 2021 : आज KKR आणि DC भिडणार, कोण मारणार बाजी?

IPL 2021 : आज KKR आणि DC भिडणार, कोण मारणार बाजी?

दिल्ली | Delhi

IPL 2021 मध्ये आज दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) एकमेकांविरोधात मैदानावर उतरणार आहेत. शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळवण्यात येईल. यातील विजेता संघ अंतिम फेरीत दाखल होईल. चेन्नईने यापूर्वीच अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे.

भारतात खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खराब कामगिरीनंतर कोलकाताच्या संघानं दुसऱ्या टप्प्यात कर्णधार इयोन मोर्गन (Eoin Morgan) च्या नेतृत्त्वात उत्तम खेळी करत वापसी केली. IPL 2014 प्रमाणे संघ पुन्हा एकदा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. पण कोलकातासमोर दिल्लीचं आव्हान आहे.

कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या दिल्लीच्या संघानं पॉइंट्स टेबल (Points Table) मध्ये सर्वात अव्वल स्थान पटकावलं होतं. अशातच आज दिल्ली किताबावर नाव पटकावण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. तसेच कोलकाता आपल्या तिसऱ्या आयपीएल किताबावर नाव कोरण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची शक्यता आहे.

कसे आहेत संघ ?

दिल्ली कॅपिटल्स :

ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, ललित यादव, आवेश खान, रिपल पटेल, इशांत शर्मा, उमेश यादव, प्रवीण दुबे, विष्णू विनोद, कुलवंत खेजरोलिया, लुकमन मेरीवाला, शिमरॉन हेटमयार, स्टिव्ह स्मिथ, आनरिख नॉर्किए, कागिसो रबाडा, टॉम करन, बेन ड्वारशियस, मार्कस स्टोइनिस, सॅम बिलिंग्ज.

कोलकाता नाइट रायडर्स :

ईऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शुभमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, गुरकीरत, करुण नायर, शेल्डन जॅक्सन, वरुण चक्रवर्ती, हरभजन सिंग, पवन नेगी, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, एम प्रसिध कृष्णा, संदीप वॉरियर, वैभव अरोरा, सुनील नरिन, शाकिब अल हसन, आंद्रे रसेल, लॉकी फग्र्युसन, टीम साऊथी, बेन कटिंग, टीम सायफर्ट.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com