IPL 2021 : आज कोलकाता नाईड राईडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई पहिला विजय नोंदवणार?

IPL 2021 : आज कोलकाता नाईड राईडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई पहिला विजय नोंदवणार?

IPL च्या चौदाव्या हंगामातील पाचवा सामना आज चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानात (M. A. Chidambaram Stadium) पार पडणार आहे.

मुंबई | Mumbai

IPL च्या चौदाव्या हंगामातील पाचवा सामना आज चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानात (M. A. Chidambaram Stadium) पार पडणार आहे.

कोलकाता नाईड राईडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात पाचवा सामना होत आहे. कोलकाता नाईट राईडर्स संघाचे नेतृत्व इयॉन मॉर्गन करणार आहे. तर, मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी रोहीत शर्मावर आहे.

मुंबईचा पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पराभव केला होता. तर कोलकाताने हैदराबादचा पराभव केला होता. गुणतक्त्यात मुंबई पाचव्या तर कोलकाता दुसऱ्या स्थानावर आहे.

या सामन्यात मुंबई संघात क्विंटन डी कॉकचा समावेश होणार आहे. क्वारंटाइनमुळे तो पहिली लढत खेळू शकला नाही. आता तो निवडीसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सलामीला पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि डी कॉक येण्याची शक्यता आहे. यामुळे ख्रिस लीनला बाहेर बसवले जाईल.

मुंबईकडे आघाडीच्या फळीत रोहित, डी कॉक, सूर्यकुमार यादव सारखे फलंदाज आहेत. तर मधळ्या फळीत पंड्या बंधू आणि कायरन पोलार्ड सारखे स्फोटक फलंदाजी करणारे खेळाडू आहेत. यामुळेच KKRच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल.

कोलकात्याचा संघात नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, शुभमन गिल, ओयन मॉर्गन असे स्फोटक बॅट्समन आहेत. तर शाकिब अल हसन आणि आंद्रे रसेल यांच्यासारखे जगातले सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत. प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, पॅट कमिन्स, हरभजन सिंग या गोलंदाजांवर मुंबईला रोखण्याची मदार असेल.

संभाव्य संघ...

मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, मॅक्रा जॅनसेन, ट्रेंट बोल्ट जसप्रीत बुमराह

कोलकाता नाइट रायडर्स

शुभमन गिल, नितिश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, इयान मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, हरभजन सिंग, वरुण चक्रवर्ती

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com