IPL 2021 : आज RR आणि DC यांच्या लढत, कोण जिंकणार सामना?

दिल्ली सलग दुसरा विजय मिळवणार की राजस्थान विजयाचं खातं उघडणार
IPL 2021 : आज RR आणि DC यांच्या लढत, कोण जिंकणार सामना?

मुंबई | Mumbai

आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रंगणार आहे. दिल्लीचं कर्णधारपद ऋषभ पंतकडे आहे. तर राजस्थानचं कर्णधारपद संजू सॅमसनच्या हाती आहे.

दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच आयपीएलमध्ये टीमचं नेतृत्व करत आहेत. दिल्ली संघाने पहिल्याच सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. तर राजस्थान रॉयल्सचा पंजाब किंग्जविरुद्ध निसटता पराभव झाला होता.

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२१च्या हंगामाची सुरूवात शानदार झाली. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्सला सात विकेटनी मात दिली. या विजयासह दिल्लीचा आत्मविश्वास उंचावला आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना रंगतदार झाला. राजस्थान रॉयल्सला या पराभवानंतर दमदार पुनरागमनाचा विश्वास आहे.

दरम्यान, दोन्ही संघ आपल्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे चिंतेत आहेत. राजस्थान रॉयल्सचा बेन स्टोक्स दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गलंदाज एनरिच नोर्जे करोनामुळे क्वारंटाईन आहे. त्यासोबतच कॅगिसो रबाडाच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलच्या इतिहासात २२ वेळा आमनेसामने आले होते. दोन्ही संघांनी ११-११ सामने जिंकले आहेत. आयपीएल गुणतालिकेत दिल्लीचा संघ दूसऱ्या स्थानी आहे. तर राजस्थानचा संघ सहाव्या स्थानावर आहे.

असा असू शकतो संभाव्य संघ

राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसन (कर्णधार), मनन वोहरा, जोस बटलर, लियम लिविंगस्टोन, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाळ, चेतन सकारिया, मुस्ताफिजुर रहमान

दिल्ली कॅपिटल्स

ऋषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमेयर, ख्रिस वॉक्स, आर. अश्विन, आवेश खान, कागिसो रबाडा/ टॉम करन, अमित मिश्रा

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com