IPL- 2021 : कोलकात्याचा मुंबईवर विजय

IPL- 2021 : कोलकात्याचा मुंबईवर विजय

अबुधाबी | वृत्तसंस्था Abudhabi

मुंबई इंडियन्स Mumbai Indians आणि कोलकाता नाईट रायडर्स Kolkata Knight Riders यांच्यात IPL-2021 च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स ने बाजी मारली.

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला मुंबई इंडियन्सनच्या रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक चांगली सुरवात केली . मुंबई चा संघ ७८ धावांपर्यंत असताना रोहित शर्मा ३० चेंडूत ३३ धावा करीत माघारी परतला .

रोहित बाद झाल्यानंतर मुंबईची धावगती थोडी मंदावली रोहित शर्मा नंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. सूर्यकुमार यादवला अवघ्या पाच धावांवर प्रसिद्ध कृष्णाने बाद करुन मुंबईला दुसरा धक्का दिला. डिकॉकला ५५ धावांवर प्रसिद्ध कृष्णाने माघारी धाडले.

नंतर इशान किशन आणि पोलार्ड यांनी मुंबईची धावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला. फर्ग्युसनने किशनला १४ धावांवर बाद केले . पोलार्डला साथ देण्यासाठी कृणाल पांड्या मैदानावर आला. कृणाल पांड्या १२ धावांवर बाद झाला. मुंबईच्या संघाने १५५ धावा करून कोलकाता संघासमोर १५६ धावांचे आव्हान ठेवले.

मुंबई इंडियन्सने दिलेल्या १५६ धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या संघाने आक्रमक सुरवात केली . शुभमन गिल आणि वेंकटेश अय्यर यांनी सुरवातीपासूनच मुंबईच्या संघाचा समाचार घेण्यास सुरुवात केली.

शुबमन गिलने एक षटकार आणि एक चौकार मारत १३ धावांवर जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर वेंकटेश अय्यर व राहुल त्रिपाठीने कोलकाताच्या संघास अर्ध शतका पर्यंत नेले. वेंकटेश अय्यरने ३ षटकार आणि ४ चौकारांचासह २५ चेंडूत अर्धशतक झळकावलं. ५३ धावांवर असताना बुमराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

अय्यरनंतर राहुल त्रिपाठीने अर्धशतक झळकावलं. त्रिपाठीने ४२ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली. वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे हा विजय सोपा झाला. नितीश राणाने १६ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विजयी चौकार मारत सामना संपवला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com