IPL-2021: कोलकात्याची दिल्लीवर मात

IPL-2021:  कोलकात्याची दिल्लीवर मात

अबुधाबी | वृत्तसंस्था

IPL-2021च्या कोलकाता नाइट रायडर्स Kolkata Knight Riders आणि दिल्ली कॅपिटल्सच्या Delhi Capitals संघात झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स च्या संघाने बाजी मारली.

कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेऊन दिल्लीच्या संघास फलंदाजीस आमंत्रण दिले. दिल्ली संघाच्या शिखर धवनसोबत स्टीव्ह स्मिथने सलामी देत सुरवात चांगली करण्याचा प्रयत्न केला.स्टीव्ह स्मिथ ३९ धावांवर असतानाच लॉकी फर्ग्युसनने त्याला झेल बाद करीत माघारी पाठविले. धवनने स्मिथसोबत ३५ धावांची भागीदारी करीत संघास धावांचे योगदान दिले .

शिखर धवन नंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यरला सुनील नरिनने बाद केले. त्या पाठोपाठ ललित यादवही माघारी परतला.शंभरी पार करण्या आगोदारच दिल्लीने ९२ धावांवर आपले सहा फलंदाज गमावले. ऋषभ पंतने ३९ धावा करीत कोलकाताच्या संघास शंभरी पार नेले . दरम्यान दिल्लीचा संघ १२७ धावांपर्यंत च पोहचू शकला. कोलकात्याच्या संघास १२८ धाव संख्येचे आव्हान ठेवले.

दिल्लीच्या १२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. कोलकाताचा सलामीवीर वेंकटेश अय्यरला ललित यादवने १४ धावांवर बाद केले. राहुल त्रिपाठीने मैदानात चांगली सुरवात करीत उत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला . आवेश खानने राहुल त्रिपाठीचा अवघ्या ९ धावांवर बळी घेतला.अय्यर आणि त्रिपाठी बाद झाल्यानंतर कोलकाताचा वेग थोडा मंदावला.

१० षटका पर्यंत कोलकाताला २ बाद ६७ धावांपर्यंत मजल मारता आली. शुभमन गिल व मॉर्गन हे ही माघारी परतले .शुभ्मान गिल ने ३० धावां केल्या .दिनेश कार्तिक व नितीश राणा ने धावसंख्या वाढविली .नितीश राणा ३६ धावा करून नाबाद राहिला . नितेश राणाने जिंकण्यासाठी २ धावांची गरज असतांना चौकार लगावत ३ गडी राखून दिल्लीवर विजय मिळवला.

Related Stories

No stories found.