IPL-2021 : चेन्नईचा हैदराबादवर विजय

IPL-2021 :  चेन्नईचा हैदराबादवर विजय

दुबई | वृत्तसंस्था

IPL 2021च्या आज सनराइजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने बाजी मारली.

नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादचाचे सलामी वीर जेसन रॉय आणि केन विलियमसन यांनी खेळाची सुरवात करताच हैदराबादच्या संघास केवळ सात चेंडूत पहिला धक्का बसला. हेझलवूडच्या गोलंदाजीवर धोनीने जेसन रॉयला झेलचीत करत ७ चेंडूत केवळ २ धावांवर माघारी पाठविले.

जेसन रॉय बाद झाल्यानंतर पाठोपाठ केन विलियमसनही अकरा धावांवर ब्राओच्या गोलंदाजीवर पायचीत झाला झाला. ब्राओच्या गोलंदाजी वर प्रियाम गर्गही सात धावाकरून माघारी परतला .वृद्धिमान साहाने हैदराबादच्या संघास धावसंख्या वाढविण्यास चांगले योगदान दिले . वृद्धिमान साहाने ४६ चेंडूत ४४ धावा केल्या.जडेजाच्या गोलंदाजीवर धोनीने वृद्धिमान साहाला ४४ धावांवर झेलचीत करीत माघारी पाठविले .

वृद्धिमान साहा बाद झाल्या नंतर हैदराबादच्या संघाची धावगती मंदावली. अब्दुल समादनं आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादच्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र अभिषेक शर्मा ही १८ धावा करीत तंबूत परतला .पाठोपाठ अब्दुल समाद ही १८ धावांवर माघारी फिरला.त्यानंतर मैदानात आलेला जेसन होल्डरही पाच धावांवर बाद झाला.

रशीद खान व भुवनेश्वर कुमार यांनी १९ धावंची भागीदारी करीत हैदराबादच्या संघास १३४ धावांपर्यंत पोहचविले. हैदराबादच्या संघाने चेन्नई ला १३५ धावंचे आव्हान दिले .

हैदराबादने दिलेल्या १३५ धाव संख्येचे आव्हान चेन्नईच्या संघाने परत करताना सलामीला आलेल्या फाफ डूप्लेसी व ऋतुराज गायकवाड यांनी जोरदार फटके बाजी करीत सुरवात केली . जेसन होल्डरने ऋतुराजला बाद केले. ऋतुराजने दोन षटकार व चार चौकार सह ४५ धावांचे योगदान चेन्नई च्या संघास दिले .

मोईन अली १७ धावा करून रशीद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला .त्या पाठोपाठ सुरेश रैना देखील अवघ्या दोन धावांवर माघारी परतला. जेसन होल्डरने त्या पाठोपाठ फाफ डूप्लेसीला ४१ धावांवर तंबूत पाठविले .

अंबाती रायडू व महेंद्रसिंग धोनी यांनी संघाला जिंकण्याच्या दिशेने नेले .शेवटच्या तीन चेंडूत दोन धावांची गरज असताना महेंद्रसिंग धोनीने षटकार उंचावून चेन्नईच्या संघास विजय प्राप्त करून दिला. आयपीएलमध्ये १०० झेल घेण्याचा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर नोंदवला गेला आहे.

Related Stories

No stories found.