IPL-2021 : बंगळुरुचा राजस्थानवर विजय

IPL-2021 : बंगळुरुचा राजस्थानवर विजय

दुबई | वृत्तसंस्था

आज IPL-2021 च्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोर च्या संघाने बाजी मारली.

रॉयल चॅलेंजर बेंगलोर च्या संघाने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्स च्या संघास फलंदाजीस आमंत्रित केले. राजस्थानचे सलामीवीर एव्हिन लुईस व यशस्वी जयस्वालने धडाकेबाज सुरवात केली. सलामीवीर एव्हिन लुईस व यशस्वी जयस्वालने आठ षटकात संघाला ७० धावांच्या पुढे नेले . ख्रिस्तियनने यशस्वी जयस्वालला ३१ धावांवर बाद केले.

यशस्वी जयस्वाल नंतर एव्हिन लुईसच्या साथीला कर्णधार संजू सॅमसन मैदानात आला. दोघांनी धावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला परंतु जॉर्ड गार्टनच्या गोलंदाजीवर एव्हिन लुईस ५८ धावा करुन बाद झाला. त्यानंतर शहाबाजने संजू सॅमसनला १९ धावांवर माघारी पाठविले .

संजू सॅमसन बाद झाल्यानंतर राहुल तेवातियाही दोन धावांवर माघारी परतला. पंधरा षटकांत राजस्थानचा निम्मा संघ बाद झाला , संघाची धावगती पुढे नेण्याची जबाबदारी लिव्हिंगस्टोन आणि रियान पराग यांच्यावर आली. चहलने लिव्हिंगस्टोनला सहा धावांवर बाद करत राजस्थानला सहावा धक्का दिला.

पाठोपाठ गडी बाद झाल्याने राजस्थानची चांगली धावगती मंदावली. राजस्थानच्या संघाने वीस षटकात १४९ धावा करीत रॉयल चॅलेंजर बेंगलोर समोर १५० धावांचे आव्हान दिले .

राजस्थानच्या संघाने दिलेल्या १५१ धावांचे लक्ष ठेवत रॉयल चॅलेंजर बेंगलोर च्या संघाच्या विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांच्या जोडीने जोरदार फलंदाजीस सुरवात केली . पहिल्या षटकात विराट कोहलीने तीन चौकार ठोकत धावसंख्या वाढीस सुरवात केली.

तिसऱ्या षटकात वेगवान गोलंदाज चेतन साकारियाच्या गोलंदाजीवर राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने बंगळुरुचा दुसरा सलामीवीर देवदत्त पडिक्कलचा सोपा झेल सोडला. देवदत्त तेव्हा ६ धावांवर खेळत होता. मात्र या जीवदानाचा देवदत्तला फायदा उचलता आला नाही. बंगळुरुचा कप्तान चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला. रियान परागने त्याला धावबाद केले. विराटने २५ धावा केल्या. त्यानंतर केएस भरत आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी संघाचा डाव सांभाळला.

तेराव्या षटकात केएस भरत आणि ग्लेन मॅक्सवेल बंगळुरुचे शतक फलकावर लावले. भरतचे अर्धशतक होऊ शकली नाही . मुस्तफिजुरने त्याला ४४ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने धुरा सांभाळत धावसंख्या वाढविलीत्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. मॅक्सवेलने ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५० धावा केल्या. १७.१ षटकात बंगळुरूने आव्हान पूर्ण केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com