IPL-2021 : बंगळुरूचा मुंबईवर विजय

IPL-2021 : बंगळुरूचा मुंबईवर विजय

दुबई| वृत्तसंस्था

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू Royal Challengers Bangalore आणि मुंबई इंडियन्स Mumbai Indians यांच्यात आज ipl-2021 च्या खेळल्या गेलेल्या सामन्यात बंगळुरूच्या संघाने बाजी मारली .

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून मैदानात आले .

पहिल्या षटकात देवदत्त पडिक्कल शून्य धावसंख्येवर बाद झाला .त्यानंतर के एस भरत मैदानात उतरला . विराट कोहली आणि भरतने बंगळुरू च्या संघाची धावगती वाढविली. राहुल चाहर नी आर सी बी ला धक्का देत भरत ला ३२ धावांवर बाद केले .

के एस भरत नंतर ग्लेन मॅक्सवेल मैदानात आला. ग्लेन मॅक्सवेल व विराट कोहली ने चांगली धावसंख्या वाढवत चांगली भागीदारी केली .तेराव्या षटकात ग्लेन मॅक्सवेल ने आर सी बी च्या संघास शंभरी वर नेले . ग्लेन मॅक्सवेल ने आर सी बी च्या संघासाठी सर्वाधिक ५६ धावा केल्या. पंधराव्या षटकात मिलन ने विराट कोह्लीस ५१ धावांवर बाद केले .रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू च्या संघाने १६५ धावा करून मुंबईच्या संघाला १६६ धावांचे आव्हान दिले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने दिलेले धावसंख्येच्या आव्हान मुंबई च्या संघाला पूर्ण करता आले नाही. मुंबई चा संघास फ़क़्त १११ धावा काढता आल्या .

सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक मैदानात उतरले . ७ व्या षटकात मुंबईला पहिला धक्का देत चहने डिकॉकला बाद केले.

रोहित शर्मा आणि डिकॉक ने ५७ धावांची भागीदारी केली. १० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित शर्माला मॅक्सवेलने बाद केले. रोहित शर्माने २८ चेंडूत ४३ धावा केल्या.चहलने इशांत किशनला बाद करून मुंबईला तिसरा धक्का दिला. हर्षल पटेलने त्याचा झेल पकडला. त्यापाठोपाठ किरोन पोलार्डही बाद झाला केलं. त्यामुळे मुंबईच्या संघावर दडपड वाढलं. हर्शल पटेलने या सामन्यात ४ गडी बाद केल्याने त्याच्या नावावर २३ विकेट्स झाल्या .

Related Stories

No stories found.