मुंबई | Mumbai

आयपीएलच्या (IPL) यंदाच्या लिलावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन Arjun Tendulkar) याला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघानं आपल्या चमूमध्ये सहभागी केलं आहे.

अनकॅप खेळाडूंमध्ये अर्जुनचं नाव न आल्यानं सर्व बुचकळ्यात पडले होते, परंतु मुंबई इंडियन्सनं त्याला शॉर्ट लिस्ट करून अखेरच्या फेरीसाठी राखून ठेवले आणि लिलावातील शेवटचं नाव हे अर्जुनचेच होते. पहिल्या फेरीत अर्जुन तेंडुलकर याच्यावर एकाही संघ मालकानं बोली लावली नव्हती. मात्र, मुंबईनं लिलावाच्या अखेरच्या फेरीत अर्जुन तेंडुलकरला खरेदी केलं. अर्जुन तेंडुलकरला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच २० लाख रुपयांना खरेदी केलं आहे.

मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरचं आपल्या संघात जोरदार स्वागत केलं आहे. एका खास व्हिडीओद्वारे अर्जुनचं स्वागत केलं आहे. अर्जुनच्या रक्तातच क्रिकेट आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुंबई संघाने स्वागत केल्यानंतर अर्जुनने देखील आभार व्यक्त करणारा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अर्जुन म्हणतो, लहानपणापासून मी मुंबई इंडियन्सचा चाहता आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी प्रशिक्षक, कोच, संघ मालक आणि सपोर्ट स्टाफ यांचे आभार मानतो. मुंबई पल्टन संघाचा भाग झाल्याबद्दल मी उत्साही आहे आणि लवकरच ब्ल्यू गोल्ड जर्सी घालण्याची वाट पाहतोय.

अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) अर्जुनचं कौतुक केलं आहे. साराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन अर्जुनचं कौतुक केलं आहे. अर्जुनला मुंबई इंडियन्सने ताफ्यात सामावून घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन अर्जुनच्या स्वागताची एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. तीच पोस्ट साराने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. सोबत साराने म्हटलं आहे की, 'ही संधी तुझ्याकडून कोणीच हिरावू शकणार नाही'.

दरम्यान, अर्जुन तेंडुलकरने नुकत्याच हरियाणाविरूद्ध राष्ट्रीय टी -20 चॅम्पियनशिप सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई वरिष्ठ संघाकडून पदार्पण केले. अर्जुनने यापूर्वी वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. या युवा क्रिकेटपटूने नुकत्याचं पार पडलेल्या प्रतिष्ठित पोलिस शिल्ड स्पर्धेत आपला प्रभावित दाखवला होता. श्रीलंका दौर्यावर अर्जुनने भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.