IND vs SA : ऐतिहासिक मालिकेत भारताला विजयाची संधी

IND vs SA : ऐतिहासिक मालिकेत भारताला विजयाची संधी

केपटाऊन | Cape Town

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) तिसरा म्हणजेच अखेरचा कसोटी सामना आजपासून केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येणार आहे...

जोहान्सबर्ग (johannesburg) कसोटी गमावल्यामुळे आत्मविश्वास गमावलेला भारतीय संघ (Team India) विजयी ट्रॅकवर येण्यासाठी सज्ज आहे. भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे भारतीय कसोटी सामन्यांचा नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पाठदुखीच्या दुखण्यातून सावरला आहे.

त्यामुळे आजच्या सामन्यात तो भारताचे कर्णधारपद भुषवेल. दोन्ही संघांनी मालिकेत १-१ असे सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना मालिका खिशात टाकण्याची समान संधी आहे.

भारताला केपटाऊन मैदानावर अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे मधल्या फळीला आपला खेळ उंचावावा लागणार आहे. जोहान्सबर्ग कसोटीत पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरल्यानांतर दुसऱ्या डावात शानदार अर्धशतके ठोकून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) लयीत परतले आहेत. त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे.

भारतीय संघात कर्णधार विराट कोहली पुनरागमन करणार आहे. त्यामुळे भारतीय संघात काही बदल अपेक्षित आहेत. हनुमा विहारीच्या (hanuma vihari) जागी विराट कोहली (Virat Kohli), हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या मोहंमद सिराजच्या (mohammed siraj) जागी उमेश यादव किंवा ईशांत शर्मा (Ishant Sharma) आणि यष्टीरक्षक रिषभ पंतच्या (Rishabh Pant) बदली के. एस. भरत (K. S. Bharat) अथवा वृद्धिमान सहाला (wriddhiman saha) अंतिम ११ मध्ये स्थान मिळू शकते.

शिवाय डीन एल्गार, रुसी वेन्डर ड्यू सेन आणि उपकर्णधार टेम्बा बाऊमा यांना जोहानर्सबर्ग कसोटीत भारतीय संघाचे जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (jasprit bumrah) सामना करताना फारसा त्रास जाणवला नव्हता. आजच्या निर्णायक सामन्यात जसप्रीत बुमराहकडून आणि इतर गोलंदाजांकडून चांगली कामगिरी भारताला अपेक्षित आहे.

शिवाय विराट कोहली आपल्या कसोटी कारकिर्दीतील ९९ वा सामना खेळणार आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला पहिल्या डावात किमान ३०० धावांचा पल्ला गाठणे आवश्यक आहे. ज्यामुळे प्रतिसस्पर्धी संघावर दडपण आणण्यात यश मिळू शकेल.

भारताप्रमाणे (IND) दक्षिण आफ्रिकेचे (SA) आघाडीचे गोलंदाज लुंगी इंगिडी कांगिसो रबाडा, कमालीचे फॉर्मात असून, त्यांना आपला फॉर्म असाच कायम ठेवण्याची आणि इतर गोलंदाजांची साथ आवश्यक असणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण १: ३० पासून स्टार स्पोर्ट्सवर होईल.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.