Tokyo Olympics : वंदनाची हॅट्ट्रिक; महिला हॉकी संघाचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

Tokyo Olympics : वंदनाची हॅट्ट्रिक; महिला हॉकी संघाचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

टोकियो | Tokyo

भारतीय महिला हॉकी संघाने (Indian women's hockey team) पूल-ए च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा (South Africa women's hockey team) ४-३ असा पराभव केला...

भारतासाठी वंदना कटारियाने (Vandana Kataria) तीन आणि नेहा गोयलने (Neha Goyal) एक गोल केला. वंदना कटारिया ऑलिम्पिक सामन्यात हॅट्ट्रिक (Hat-trick) करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. ब्रिटनने (Britain) आज आयर्लंडला (Ireland) हरवले तर भारत उपांत्यपूर्व फेरी गाठणार आहे.

पहिल्या क्वार्टरमध्ये वंदनाने भारताला जोरदार सुरुवात करून दिली. चौथ्या मिनिटाला तिने गोल केला. मात्र, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणात बरोबरी साधली. वंदनाने दुसऱ्या क्वार्टरमध्येदेखील आक्रमक खेळून २-१ असा स्कोअर केला. पूर्वार्धात सामना २-२ असा होता.

नेहा गोयलने तिसऱ्या क्वार्टरमध्ये केलेल्या गोलमुळे भारताने पुन्हा एकदा ३-२ ने आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेने जोरदार पुनरागमन करीत तिसरा गोल केला. परंतु ४९ व्या मिनिटाला वंदनाने तिसरा गोल केल्यामुळे भारताने ४-३ ने दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com