भारताच्या टेनिसपटूचे करोनावर रॅप !...
क्रीडा

भारताच्या टेनिसपटूचे करोनावर रॅप !...

’मास्क ऑन- रॅप साँग ऑन कोरोनाव्हायरस’ इंटरनेटवर ठरतोय चर्चेचा विषय

Ramsing Pardeshi

मुंबई -

सध्याच्या युगात मास्क घालणे ही काळाची गरज आहे. करोनाच्या प्राणघातक विषाणूचा प्रभाव अद्याप जगभर दिसून येत आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. हा संदेश लक्षात ठेवण्यासाठी भारताचा युवा टेनिसपटू आदिल कल्याणपूरने aadil kalyanpur एक धमाल रॅप गाणे गायले आहे

आदिलचे हे गाणे इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. ’मास्क ऑन- रॅप साँग ऑन कोरोनाव्हायरस’ असे नाव असलेले हे गाणे लोकांना मास्क घालण्यास प्रवृत्त करत आहे.

जगातील लॉकडाऊनमुळे जेव्हा 20 वर्षीय आदिलला आंतरराष्ट्रीय सर्किटमधून क लागला, तेव्हा त्याने कठीण काळात गरजूंसाठी अन्नवाटप करण्यास सुरुवात केली.

जगभरात 1 कोटी 50 लाख 84 हजार 578 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 लाख 18 हजार 485 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 91 लाख 4 हजार 117 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

अमेरिकेनंतर ब्राझिल दुसर्‍या क्रमाकांवर असून 21 लाख 66 हजार 532 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 81 हजार 597 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. तर, तिसर्‍या क्रमांकावर भारत आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांची एकूण 11 लाख 92 हजार 915 झाली आहे. तर भारतानंतर रशिया, दक्षिण अफ्रिका, पेरु आणि मॅक्सिकोमध्ये कोरोनाबाधित आढळले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com