दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी २० मालिकेसाठी 'अशी' असेल टीम इंडिया

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी २० मालिकेसाठी 'अशी' असेल टीम इंडिया

मुंबई । Mumbai

आयपीएलनंतर (IPL) भारतीय संघ (Indian Team) घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ९ जूनपासून ही मालिका सुरू होणार असून या मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी काही सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर काही खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे...

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या काही युवा खेळाडूंनाही बीसीसीआयने (BCCI) संधी दिली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद के.एल. राहुल( K L Rahul) कडे सोपविण्यात आले आहे. तर दिनेश कार्तिकचे (Dinesh Karthik) तब्बल ३ वर्षानंतर संघात पुनरागमन झाले आहे.

बीसीसीआयने रोहित शर्मा (Rohit sharma) विराट कोहली (Virat kohli) यांच्यासह जसप्रीत बुमराहलाही (Jasprit Bumrah) विश्रांती दिली आहे. तर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) व दीपक चहर (Deepak Chahar) हे दुखापतीतून सावरलेले नसल्याने त्यांची निवड झालेली नाही.

तर आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये पंजाब किंग्सचा (Punjab Kings) अर्षदीप सिंग (Arshdeep Singh) व सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) उम्रान मलिक (Umran Malik) यांनी चांगली कामगिरी केल्याने त्यांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

भारत - दक्षिण आफ्रिका टी २० मालिकेचे वेळापत्रक

भारताचा पहिला टी २० सामना ९ जून रोजी दिल्ली येथे होणार आहे. तर दुसरा टी २० सामना १२ जूनला कटक येथे खेळविण्यात येणार आहे. तसेच तिसरा टी २० सामना १४ जून रोजी वायझॅग येथे होईल. चौथा टी २० सामना १७ जूनला राजकोट येथे खेळविण्यात येणार असून पाचवा सामना १९ जूनला बंगळुरु येथे होणार आहे.

भारताचा संघ खालीलप्रमाणे

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग आणि उमरान मलिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com