team india
team india

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेसाठी 'अशी' असेल टीम इंडिया

मुंबई | Mumbai

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील ३ सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) आटोपल्यानंतर ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला (One Day Series) सुरुवात होणार आहे...

हे सामने दि. १९,२१,२३ जानेवारी २०२२ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरु होणार आहेत. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे. हे सामने पाल आणि केपटाऊन येथे होतील.

पहिले दोन सामने पाल येथे होतील. भारतीय टी २० सामन्यांचा नवीन कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे कसोटी मालिकेप्रमाणे एकदिवसीय मालिकेलाही मुकणार आहे. त्याच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व लोकेश राहुल (Lokesh Rahul) तर उपकर्णधारपद भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) खांदयावर असणार आहे.

भारतीय संघात शिखर धवन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल संघात परतले आहेत. शिवाय विजय हजारे करंडकात दमदार प्रदर्शन करणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यरला संघात स्थान मिळाले आहे.

विजय हजारे करंडकात सपशेल अपयशी ठरूनही माजी अनुभवी डावखुरा सलामीवीर शिखर धवन भारतीय संघाकडून दमदार प्रदर्शन करण्यासाठी सज्ज आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताकडून शिखर धवन आणि लोकेश राहुल डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. तर यष्टीरक्षणाची जवाबदारी ईशान किशन आणि रिषभ पंतवर असेल.

भारतीय एकदिवसीय संघ असा

ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, ईशान किशन, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, व्यंकटेश अय्यर, आर अश्विन, युझवेंद्र चहल, मोहंमद सिराज, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल ठाकूर.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com