
मुंबई | Mumbai
भारत आणि वेस्टइंडिज (India and West Indies) यांच्यात १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ (Indian Team) जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही मालिकांचे कर्णधारपद रोहित शर्माकडे (Rohit Sharma) कायम ठेवण्यात आले आहे. तसेच एकदिवसीय मालिकेचे उपकर्णधारपद हार्दिक पांड्या तर कसोटीचे उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे कसोटीत मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) संघातून वगळण्यात आले असून जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) देखील विश्रांती देण्यात आली आहे. तसेच ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांना कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली आहे. तर जलदगती गोलंदाजीची जबाबदारी मुकेश कुमार आणि नवदीप सैनीवर असणार आहे.
याशिवाय एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघामध्ये सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) स्थान कायम ठेवण्यात आले असून यष्टीरक्षक म्हणून ईशान किशन आणि संजू सॅमसन यांची निवड झाली आहे. तर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यावर फिरकीची जबाबदारी राहणार असून त्यांच्या साथीला अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा असणार आहेत. तसेच वनडे मालिकेत जलदगती गोलंदाजीची धुरा उमरान मलिक, जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमारवर असेल.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार) शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ईशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार) शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, मुकेश कुमार, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार) शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, के एस भरत
भारत आणि वेस्टइंडिज मालिकेचे वेळापत्रक
पहिला कसोटी सामना – १२ जुलै ते १६ जुलै, डॉमिनिका
दुसरा कसोटी सामना – २० जुलै ते २४ जुलै, पोर्ट ऑफ स्पेन
पहिला एकदिवसीय सामना – २७ जुलै, ब्रिजटाउन
दुसरा एकदिवसीय सामना – २९ जुलै, ब्रिजटाउन
तिसरा एकदिवसीय सामना – १ ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
पहिला टी-२० सामना – ३ ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा टी-२० सामना – ६ ऑगस्ट, गयाना
तिसरा टी-२० सामना – ८ ऑगस्ट, गयाना
चौथा टी-२० सामना – १२ ऑगस्ट, फ्लोरिडा
पाचवा टी-२० सामना – १३ ऑगस्ट, फ्लोरिडा
सलिल परांजपे, नाशिक