IPL
IPL
क्रीडा

आयपीएल IPL लवकरच सुरू होणार !

आयपीएल व्यवस्थापन परिषदेची बैठक पुढील आठवड्यात

Nilesh Jadhav

दिल्ली । Delhi

करोनाचा फटका अनेक स्पर्धांना देखील बसला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या तसेच ऑक्टोबर - नोव्हेंबर'मध्ये होणारा टी20 विश्वचषक स्थगित करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC ने घेतला आहे. पण यावर्षीची इंडियन प्रीमियर लीग IPL च्या तेराव्या सिझनची सुरुवात लवकरच सुरू होणार असल्याची माहिती एएनआय ANI या वृत्त संस्थेने दिली आहे.

यावर्षीची आयपीएल IPL 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमीरातमध्ये सुरु होऊ शकते. तर आयपीएलची फायनल आठ नोव्हेंबरला होऊ शकते. तसेच यंदाचा सिझन 51 दिवसांचा असण्याची शक्यता आहे. आयपीएल व्यवस्थापन परिषदेची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे, या बैठकीत आयपीएलबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआय BCCI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com