IPL 2023 : आज CSK आणि RCB यांच्यात हायव्होल्टेज मॅच... 'अशी' असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन

IPL 2023 : आज CSK आणि RCB यांच्यात हायव्होल्टेज मॅच... 'अशी' असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२३ मध्ये आज २४वी लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होत आहे. ही लढत एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. अखेरच्या लढतीत चेन्नईचा राजस्थान रॉयल्सकडून घरच्या मैदानावर पराभव झाला होता, तर बेंगळुरूने घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता.

दोन्ही संघांना आतापर्यंत चार लढतींमधून दोनमध्ये विजय मिळवता आला असून दोन लढतींमध्ये दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या तरी दोन्ही संघ समान पातळीवर आहेत.

IPL 2023 : आज CSK आणि RCB यांच्यात हायव्होल्टेज मॅच... 'अशी' असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन
राजकारणात वेगवान घडामोडी! अजितदादांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द, बावनकुळे तडकाफडकी दिल्लीला

गुणतक्त्यात चेन्नई सहाव्या तर बेंगळुरू सातव्या स्थानावर आहे. चेन्नईचे नेट रनरेट प्लस ०.२२५ तर बेंगळुरूचे मायनस ०.३१६ इतके आहे. आरसीबीसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये आहे. तर गोलंदाज मोहम्मद सिराज आणि वेन पार्नेल देखील सुरुवातीला विकेट मिळून देत आहेत.

दुसऱ्या बाजूला राजस्थान विरुद्ध झालेल्या लढतीत चेन्नईचा निसटता पराभव झाला. डेवॉन कॉन्वेने अर्धशतकी खेळी केली होती. तर जडेजा आणि धोनीने अखेरच्या षटकात जोरदार फटकेबाजी केली, मात्र चेन्नईला विजय मिळवता आले नाही.

IPL 2023 : आज CSK आणि RCB यांच्यात हायव्होल्टेज मॅच... 'अशी' असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन
उष्माघाताने आणखी एका श्री सदस्याचा रुग्णालयात मृत्यू, मृतांचा आकडा १२ वर!

महेंद्रसिंह धोनीच्या तंदुरुस्तीकडे लक्ष

चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या तंदुरुस्तीकडे या वेळी सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत; मात्र या लढतीत खेळणार असल्याची माहिती चेन्नई सुपरकिंग्सचे सीईओ काशी विश्‍वनाथन आनंद यांनी दिली आहे.

IPL 2023 : आज CSK आणि RCB यांच्यात हायव्होल्टेज मॅच... 'अशी' असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मुलाचा एन्काउंटर, बापाची खुलेआम हत्या! ४४ वर्षात उभारलेले अतिक अहमदचे साम्राज्य ५१ दिवसांत उद्धवस्त

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

RCB प्लेइंग-11 : फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, डेव्हिड विली/वेन पारनेल, मोहम्मद सिराज .

CSK प्लेइंग-11 : डेवॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), तुषार देशपांड, महीष तीक्ष्णा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com