Women’s T20 Asia Cup 2022 : भारतीय महिला संघाने इतिहास घडवला, सातव्यांदा जिंकला आशिया कप

Women’s T20 Asia Cup 2022 : भारतीय महिला संघाने इतिहास घडवला, सातव्यांदा जिंकला आशिया कप

मुंबई | Mumbai

महिला आशिया चषक 2022 मधील अंतिम सामना शनिवारी (दि. 15 ऑक्टोबर) भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला.

सिल्हेट मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने 8 विकेट्सने हा सामना जिंकला. या सामन्यात गोलंदाज आणि फलंदाज अशा दोन्ही विभागांनी मोलाचे योगदान दिले. यासोबतच भारताने सातव्यांदा महिला आशिया चषकाची ट्रॉफी उंचावली.

भारताने श्रीलंकेचे 66 धावांचे आव्हान 8 फलंदाज आणि जवळपास 11 षटके राखून पार करत महिला आशिया कपवर सातव्यांदा कब्जा केला. भारताकडून सलामीवीर स्मृती मानधनाने 25 चेंडूत 51 धावांची धडाकेबाज खेळी केली. भारताच्या 71 धावांमधील 51 धावा एकट्या स्मृती मानधनाने केल्या.

भारताकडून रेणुका सिंहने भेदक मारा करत 3 विकेट्स मिळवल्या. श्रीलंका 50 धावा तरी करतोय की नाही अशी अवस्था असताना इनोका रणवीराने 22 चेंडूत 18 धावांची खेळी करत लंकेला 65 धावांपर्यंत पोहचवले. तिने श्रीलंकेचा ऑला आऊटही होऊ दिला नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com