AUS-W Vs IND-W 3rd ODI : भारतीय महिला संघानं कांगारुंना मायभूमीत दाखवलं अस्मान, मोडला ‘तो’ विक्रम

AUS-W Vs IND-W 3rd ODI : भारतीय महिला संघानं कांगारुंना मायभूमीत दाखवलं अस्मान, मोडला ‘तो’ विक्रम

दिल्ली | Delhi

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्याने (Indian women's cricket team) यास्तिका भाटिया (Yastika Bhatiya) आणि शफाली वर्माच्या (Shafali Varma) शानदार अर्धशतकांच्या बळावर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाचा (Australia women's team) २ गडी राखून पराभव केला. यामुळे या वनडे मालिकेत २-१ अशा फरकानं पराभव झालेला असला तरी वनडे मालिकेचा शेवट गोड झाला आहे.

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत भारतानं ३ चेंडू राखून विजय साजरा केला आहे. महत्त्वाचं म्हणजे भारतीय संगानं ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचा गेल्या २६ वनडे सामन्यांपासूनचा विजयी रथ अखेर रोखला आहे. ऑस्ट्रेलियानं मालिका जिंकली असली तरी आजच्या विजयानं भारतीय महिला संघाच्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा कारनामा भारतीय महिला संघानं केला आहे.

ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करताना भारतासमोर विजयासाठी २६५ रनचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानात्मक टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय संघाला शफाली वर्मा (Shafali Verma) आणि स्मृती मंधाना (Smriti Mandhana) जोडीनं दमदार सुरूवात करुन दिली. शफालीनं ५६ रन काढले. तर स्मृती २२ रन काढून आऊट झाली. ही जोडी फुटल्यानंतर यास्तिका भाटियाला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याची मॅनेजमेंटची चाल यशस्वी झाली.

यास्तिकानं सर्वाधिक ६४ रन काढले. कॅप्टन मिताली राज आणि रिचा घोष झटपट आऊट झाल्यानं भारतीय टीमची चिंता वाढली होती. मात्र त्यानंतर निर्णायक क्षणी दीप्ती आणि स्नेह राणानं पार्टनरशिप करत टीमला विजयाच्या जवळ नेलं. या दोघी आऊट झाल्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचमध्ये रंगत वाढली होती. त्यावेळी झुलन गोस्वामीनं भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने ९ बाद २६४ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघ षटकात ४ बाद ८७ धावांवर संकटात सापडला होता पण एश्लेग गार्डनर (६७) आणि बेथ मूनी (५२) यांनी संघाला सावरले. ताहलिया मॅकग्रानेही ४७ धावांची शानदार खेळी खेळली. भारतासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने ३७ धावांत ३ तर पूजा वस्त्राकरने ४६ धावांत ३ बळी घेतले. झुलनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Related Stories

No stories found.