भारत विरुद्ध विंडीज टी-२० मालिकेचा थरार आजपासून

भारत विरुद्ध विंडीज टी-२० मालिकेचा थरार आजपासून

त्रिनिदाद | Trinidad

भारतीय एकदिवसीय संघाचा सलामीवीर आणि कर्णधार शिखर धवनचे (Shikar Dhawan) कुशल नेतृत्व आणि भारत विरुद्ध विंडीज (IND vs WI) यांच्यातील एकदिवसीय मालिकेत (ODI Series) मालिकावीर किताबाचा मानकरी ठरलेल्या शुभमन गिल (Shubman Gill) या दोन्ही खेळाडूंच्या शानदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले....

प्रचंड फॉर्मात असलेली टीम इंडिया (Team India) आता ५ सामन्यांच्या टी २० मालिकेवर (T20 Series) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात निर्विवाद वर्चस्व राखण्याच्या इराद्याने आज मैदानात उतरणार आहे. त्रिनिदादच्या ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर ही लढत भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता होणार आहे.

भारत विरुद्ध विंडीज टी-२० मालिकेचा थरार आजपासून
नाशिक जिल्हा परिषदेचे 'असे' आहे गट आरक्षण; वाचा सविस्तर

सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे. या मालिकेत विजयी सुरुवात करण्यासाठी भारत आणि विंडीज आज आमनेसामने येणार आहेत. एकदिवसीय मालिकेतील पराभव विसरून नव्याने सुरुवात करण्याचा विंडीज संघाचा मानस असणार आहे.

भारत विरुद्ध विंडीज टी-२० मालिकेचा थरार आजपासून
शरद पवारांचे नाशकात आगमन

दुसरीकडे एकदिवसीय मालिकेप्रमाणे टी २० मालिकेत विंडीज संघावर मात करून ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी आपला सर्वोत्तम संघ बनवण्याची दोन्ही संघांना संधी मिळणार आहे.

भारत विरुद्ध विंडीज टी-२० मालिकेचा थरार आजपासून
त्यांच्याकडून जरा निष्ठेच्या चार गोष्टी शिका; राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

पण टी २० मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा नियमित सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुल (KL Rahul) करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) येण्याची शक्यता आहे.

भारत विरुद्ध विंडीज टी-२० मालिकेचा थरार आजपासून
ठरलं! यंदाचा आशिया चषक 'या' देशात

शिवाय अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीतून सावरलेला नाही त्यामुळे भारतीय संघ निवडताना कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, निकोलस पुरण हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com