IND vs WI : सिरीजवर कब्जा करण्यासाठी टीम इंडिया सज्ज, कुणाचे पारडे जड?

FIle Photo
FIle Photo

फ्लोरिडा | Florida

भारताने विंडीजवर (West Indies) एकदिवसीय मालिकेप्रमाणे टी २० मालिकेत (T20 Series) वर्चस्व कायम ठेवले. आज शनिवारी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील चौथा टी २० सामना जिंकून आता विंडीजवर मालिका विजय संपादन करण्यासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कंपनी आज मैदानात उतरणार आहे....

हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा मधल्या फळीतील स्थानासाठी दीपक हुडा (deepak hooda) आणि फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्यात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आता फ्लोरिडा येथील अखेरचे २ सामने जिंकून आशिया चषकात आत्मविश्वासाने सहभागी होण्याचा रोहित शर्मा आणि कंपनीचा निर्धार असणार आहे.

दुसरीकडे कॅरेबियन धर्तीवर झालेल्या पहिल्या ३ सामन्यांमध्ये २-१ ने पिछाडीवर पडलेल्या विंडीज संघासाठी मालिका वाचवण्याची ही शेवटची संधी असेल. आजच्या सामन्यात विजय संपादन करून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधण्यासाठी विंडीज सामन्यात नवीन रणनीतीसह उतरण्याची शक्यता आहे.

FIle Photo
राज्यात अतिवृष्टीचा इशारा; नाशिकसह 'या' भागात ऑरेंज अलर्ट

आजच्या सामन्यात भारतीय संघात श्रेयस अय्यरला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आवेश खानला बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरच्या बदली दीपक हुडला अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

FIle Photo
मुख्यमंत्र्यांची अशीही संवेदनशीलता; महावितरणच्या कर्मचाऱ्याला तातडीने मदत

आवेश खानला डच्चू दिल्यास कोणाला संधी मिळणार? याचा निर्णय नाणेफेकी दरम्यान स्पष्ट होईल. यासाठी रोहित शर्मा अँड कंपनीकडे अक्षर पटेल, संजू सॅमसन आणि ईशान किशन हे पर्याय उपलब्ध आहेत.

आजच्या सामन्यात रिशभ पंत, सूर्यकुमार यादव, निकोलस पुरण, जेसन होल्डर हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com