
नवी दिल्ली | New Delhi
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघांमध्ये ५ टी २० सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील तिसरा टी २० सामना आज मंगळवारी रात्री ८ वाजता खेळवण्यात येणार आहे.
यजमान वेस्ट इंडिज संघाने सलामीच्या २ लढतींमध्ये विजय संपादन केला आहे. यजमान वेस्ट इंडिज संघाने मालिकेतील तिसरा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्यासाठी वेस्ट इंडिज संघ मैदानावर उतरणार आहे. भारतीय संघाला मालिकेत पुनरागमन करण्याची शेवटची संधी असणार आहे.
सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा आणि डिडी स्पोर्ट्स चॅनल वर करण्यात येणार आहे. सलामीच्या दोन लढतींमध्ये भारतीय संघाची गोलंदाजी फलंदाजीच्या तूलनेत अधिक सरस ठरली असून भारतीय संघाला फलंदाजीतील चूका सुधारण्याची शेवटची संधी आहे. भारतीय संघाच्या तूलनेत वेस्ट इंडिज संघाने टी २० मालिकेत आपला खेळ कमालीचा उंचावला आहे. विंडीज संघाला मालिका विजयाची सर्वाधिक संधी असणार आहे.
सलिल परांजपे, नाशिक.