
मुंबई | Mumbai
एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत इंग्लंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिज (WI) गाठून कॅरेबियन दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली, भारताने ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. आता तिसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे बुधवारी म्हणजेच आज २७ जुलै रोजी होणार आहे.
हा सामनाही जिंकून भारताला वेस्ट इंडिजचा मालिकेत क्लीन स्वीप करायचा आहे. या मालिकेमध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय प्रकारात सलग १२ वी मालिका जिंकून नवा विश्वविक्रम रचलाय.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियावर कोणतंही दडपण नसेल. अशा परिस्थितीत टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठं बदल करून प्रयोग करण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल यावर एक नजर टाकूया.
अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल, शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.