भारत-दक्षिण आफ्रिका T-20 मालिकेत 'हा' निर्णय रद्द; वाचा सविस्तर

भारत-दक्षिण आफ्रिका T-20 मालिकेत 'हा' निर्णय रद्द; वाचा सविस्तर

मुंबई । Mumbai

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India v South Africa) यांच्यातील ५ सामन्यांची टी २० मालिका ९ जून ते १९ जून दरम्यान खेळवली जाणार असून हे ५ सामने नवी दिल्ली (New Delhi) कटक (cuttack) विशाखापट्टणम (Visakhapatnam) राजकोट (Rajkot) बंगळूर (Bangalore) येथे खेळवण्यात येणार आहेत...

हे सर्व सामने ९, १२, १४, १७, १९ जून दरम्यान भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता होणार आहेत. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार (Star Sports & Hotstar) वाहिनीवर करण्यात येणार आहे.

तसेच भारतीय संघातून विराट कोहली (Virat Kohli) रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना विश्रांती देण्यात आली असल्यामुळे संघाचे कर्णधारपद लोकेश राहुलकडे (KL Rahul) असणार आहे. तर उपकर्णधारपद रिषभ पंतकडे (Rishabh Pant) असणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद टेम्बा बाऊमाकडे (Temba Bavuma) कायम असणार आहे.

या मालिकेत सर्व खेळाडूंची नियमित कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात येणार आहे. सततच्या बायो- बबलमध्ये राहून थकलेल्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने (BCCI) भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत बायो- बबल (Bio bubble) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह (BCCI Secretary Jai Shah) यांनी स्वतः याची घोषणा केली आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com