Women’s World Cup 2022 : भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, 'तो' रेकॉर्ड कायम

Women’s World Cup 2022 : भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, 'तो' रेकॉर्ड कायम

मुंबई | Mumbai

न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक (Women’s Cricket World Cup 2022) स्पर्धेमध्ये भारतीय संघाने (Team India) विजयी सलामी दिली आहे. मिताली राजच्या नेतृत्वात (Mitali Raj) खेळणाऱ्या भारतीय संघाने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (IND Vs PAK) १०७ धावांनी मोठा पराभव करत आपला पहिला विजय नोंदविला.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची अवस्था ६ बाद ११४ अशी दयनीय केली होती, परंतु पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) व स्नेह राणा (Sneh Rana) यांनी विश्वविक्रमी भागादारी करून पाकिस्तानसमोर (Pakisthan) तगडं आव्हान उभं केलं. त्यानंतर गोलंदाजीत राजेश्वरी गायकवाड (Rajeswari Gaikwad), झुलन गोस्वामी (Zholan Swami), स्नेह व दीप्ती यांनी कमाल दाखवताना पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा हा पाकिस्तानवरील सलग ११ वा विजय आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर २४५ धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाची दमछाक झाली. भारताने पाकिस्तानचा अवघा संघ ४३ षटकं आणि १३७ धावांमध्येच गुंडाळला. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने गोलंदाजीत कमाल करत पाकिस्तानला धक्के दिले. त्यामुळे पाकिस्तानला शेवटपर्यंत डाव सावरता आला नाही. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर झूलन गोस्वामीने दोन गडी बाद केले.

भारतीय महिला संघाचे विश्वचषकातील वेळापत्रक

६ मार्च - वि. पाकिस्तान

१० मार्च - वि. न्यूझीलंड

१२ मार्च - वि. वेस्ट इंडिज

१६ मार्च - वि. इंग्लंड

१९ मार्च - वि. ऑस्ट्रेलिया

२२ मार्च - वि. बांगलादेश

२७ मार्च - वि. दक्षिण आफ्रिका

भारतीय संघ

मिताली राज ( कर्णधार), हरमनप्रीत कौर ( उप कर्णधार) , स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटीया, दीप्ती शर्मा, रिचा घोष ( यष्टिरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटीया ( यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com