'या' दिवशी भारत - पाकिस्तान हायव्होल्टेज सामना

'या' दिवशी भारत - पाकिस्तान हायव्होल्टेज सामना

मुंबई | Mumbai

भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट बघत असतात.अशातच आता या सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) हे दोन संघ लवकरच क्रिकेटच्या मैदानात एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. हा सामना आशिया चषकात (Asia Cup) होणार असून आशिया चषकाचे आयोजन श्रीलंका (Sri Lanka) करणार आहे. ही स्पर्धा टी २० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे...

आशिया चषकाची सुरुवात २७ ऑगस्टपासून होणार आहे. तसेच भारत - पाकिस्तान (IND VS PAK) यांच्यातील सामना २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. आशिया चषकासाठी भारत, श्रीलंका, पाकिस्तान,बांगलादेश हे संघ पात्र ठरले आहेत. तर युएई, नेपाळ,ओमान, हॉंगकॉंग या संघाना पात्रता फेरी खेळावी लागणार आहे.

दरम्यान, २१ ऑगस्टपासून पात्रता फेरीला सुरुवात होणार असून आशिया चषकाच्या प्रमुख लढती २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. तसेच या स्पर्धेत भारतीय संघाचे (team india) कर्णधारपद रोहित शर्माकडे (Rohit Sharma) असणार आहे. तर बाबर आझमकडे (Babar Azam) पाकिस्तानची धुरा असणार आहे. तर यूएईत (UAE) २०२१ साली झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या टी २० सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत करून एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला होता.

सलिल परांजपे, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com