भारत-पाकिस्तान पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; पाहा सामना कधी आणि कुठे?

भारत-पाकिस्तान पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; पाहा सामना कधी आणि कुठे?

नवी दिल्ली | New Delhi

क्रिकेट बघणाऱ्यांची संख्या आपल्याकडे मोठी आहे. त्यात भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामना असेल तर अनेकजण कामधंदा सोडून टीव्ही समोर तर अनेक हौशी मंडळी जिथे सामना असेल तिथले तिकीट बुकिंग करतात....

जगाच्या कोपऱ्यात कुठेही सामना असेल तरी त्या सामन्याला मोठी गर्दी होत असते. 2019 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपनंतर पहिल्यादाच यंदा टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) दोन्ही टीम समोरासमोर होत्या.

यानंतर आता पुढल्या वर्षीच या दोन्ही देशांच्या क्रिकेट टीम आमने-सामने येणार आहेत. २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन्ही देशांच्या महिला क्रिकेट टीम (woman cricket team) समोरासमोर येणार असल्याचे बोलले जात आहे.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth games) महिला क्रिकेटचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला असून यापूर्वी 1998 साली मलेशियात झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत पुरूषांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.

आता महिला क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान टीम मेडल जिंकण्याच्या उद्देशानं एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहेत. 'कॉमनवेल्थ गेम्समधील महिला क्रिकेटची सुरूवात 29 जुलै रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या सामन्याने होईल. 7 ऑगस्टपर्यंत क्रिकेटचे सामने होतील.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियानंतर बार्बोडस आणि पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीला सांगितले. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 31 जुलै २०२२ रोजी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com