IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धचा सामना टाय, भारतानं मालिका जिंकली... सिराज-अर्शदीपचा तांडव

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धचा सामना टाय, भारतानं मालिका जिंकली... सिराज-अर्शदीपचा तांडव

मुंबई | Mumbai

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी भारताने 9 षटकांत 4 गडी गमावून 75 धावा केल्या होत्या. त्यावेळी डीएलएस पार स्कोअर 75 धावा होता, त्यामुळे सामना टाय झाला आहे. भारत या धावसंख्येने एक धावही मागे राहिला असता तर न्यूझीलंडला या सामन्यात विजयी घोषित केले असते. भारताने ही तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-0 अशी जिंकली.

पहिला सामना पावसाने पूर्णपणे वाहून गेला होता. तेव्हा नाणेफेकही होऊ शकली नाही. त्याचवेळी टीम इंडियाने दुसरा सामना 65 धावांनी जिंकला. तिसरी टी-20 बरोबरी झाली. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर टीम इंडियाचा हा सलग दुसरा टी20 मालिका विजय आहे. यापूर्वी 2020 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत किवी संघाचा 5-0 असा पराभव केला होता.

सिराज-अर्शदीपचा तांडव

यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना दोनच गोलंदाज तुफान गाजले. यामध्ये अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. दोघांनीही प्रत्येकी 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. अर्शदीपने 4 षटकात 37 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच, सिराजने 4 षटकात 17 धावा देत 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच, हर्षल पटेल याने 1 विकेट घेतली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com