टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीला विजयी निरोप देणार का?

टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीला विजयी निरोप देणार का?

दुबई | Dubai

रविवारी अबुधाबी (Abudhabi) येथे अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) रंगलेल्या महत्वपूर्ण सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) संघाने अफगाणिस्तानवर ८ गड्यांनी दणदणीत विजय नोंदवून उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करण्यात टीम इंडियाला अपयश आलं आहे. आज सोमवारी टीम इंडिया आपला अखेरचा साखळी सामना दुबळ्या नामिबिया संघाविरुद्ध सायंकाळी ७:३० वाजता खेळणार आहे....

दोन्ही संघाची तुलना केल्यास टीम इंडियाला विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. शिवाय टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री या जोडीचा अखेरचा सामना असल्यामुळे टीम इंडियाचे सर्व शिलेदार विश्वचषकात विजयी शेवट करण्यासाठी उत्सुक आहेत.

तसेच कर्णधार विराट कोहली आपला ५० वा टी २० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. या सामन्यात त्याच्याकडून मोठी खेळी भारतीय संघाला आणि टीम इंडियाच्या सर्व समर्थकांना अपेक्षित आहे.

तसेच भारत आणि नामिबिया प्रथमच टी २० सामना खेळणार आहे. आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ मध्ये पात्रता फेरीत तीन सामन्यांमध्ये २ विजय आणि १ पराभव स्वीकारून सुपर १२ मध्ये धडाक्यात एंट्री करणाऱ्या नामिबिया संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे. त्यांना अफगाणिस्तान , पाकिस्तान , न्यूझीलंड संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आता भारतावर मात करून विजयी शेवट करण्यासाठी नामिबिया आज आपलं सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरणार आहे.

- सलिल परांजपे नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com