भारत - आयर्लंड यांच्यात आज दुसरा T20 सामना

भारत - आयर्लंड यांच्यात आज दुसरा T20 सामना

डब्लिन । Dublin

हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पहिल्या टी २० सामन्यात (T20 match) आयर्लंडचा (Ireland) ७ गडी राखून पराभव केला. तसेच दोन टी २० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेऊन दुसऱ्या टी २० सामन्यासाठी सज्ज झाला आहे...

आज भारत आणि आयर्लंड (Ind vs Ire) यांच्यात दुसरा टी २० सामना खेळविला जाणार असून भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात विजय संपादन करून भारतीय संघाचा (Indian team) मालिका विजय मिळवण्याचा इरादा असणार आहे.

आजच्या टी २० दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात ३ महत्वपूर्ण बदल केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये आवेश खान (Awesh Khan) अक्षर पटेल (Axar Patel) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना डच्चू मिळण्याची शक्यता असून त्यांच्याजागी हर्षल पटेल (Harshal Patel) राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) आणि रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) यांना संधी मिळू शकते.

तसेच पहिल्या सामन्यात पावसाने (rain) व्यत्यय आणल्यानंतर सामान उशीरा सुरु करण्यात आला होता. त्यानंतर आजही याठिकाणी ढगाळ वातावरण (Cloudy weather) असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, भारताने या अगोदर २०१८ साली आयर्लंडविरुद्ध झालेल्या दोन टी २० सामन्यांच्या मालिकेत २-० असे यश मिळवले होते. त्यानंतर आता तब्बल ४ वर्षांनी याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला मिळाली असून मालिका विजय साकारणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com