भारत - इंग्लंड वनडे मालिकेला आजपासून सुरुवात

भारत - इंग्लंड वनडे मालिकेला आजपासून  सुरुवात

ओव्हल । Oval

भारत आणि इंग्लंड (India and England) संघांमधील कसोटी आणि टी २० मालिकेचा थरार आटोपल्यानंतर आजपासून ५० षटकांच्या एकदिवसीय मालिकेला (ODI series) सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना आज ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर (Oval Cricket Stadium) होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:३० वाजता हा सामना सुरु होणार असून सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी टेन आणि सोनी सीक्स वाहिनीवर करण्यात येणार आहे...

भारतीय कर्णधार रोहित शर्मासमोर (Rohit Sharma) सध्या तिसऱ्या वेगवान गोलंदाज कोण ? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्यासमोर शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) हे पर्याय आहेत. शिवाय भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आजच्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टी २० सामन्यादरम्यान त्याच्या मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्याजागी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ईशान किशन (Ishaan Kishan) यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

तसेच इंग्लंडविरुद्ध २०१८ मध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता त्याची सर्रास परतफेड करण्यासाठी रोहित शर्मा आज नव्या डावपेचांसह मैदानात उतरणार आहे. २०२३ साली भारतात होणाऱ्या मर्यादित षटकांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघबांधणी करण्याची संधी भारतीय संघासमोर असणार आहे. शिवाय आयपीएल २०२२ (IPL 2022) पूर्वी रोहित शर्माने विंडीजविरुद्ध झालेल्या कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या मालिकेत ३-० असा मालिका विजय साकारला होता. आता इंग्लंडच्या धर्तीवर कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या मालिकेत विजयी सुरुवात करण्यासाठी रोहित शर्मा सज्ज आहे.

दरम्यान, टी २० मालिकेतील तिसरा टी २० सामना जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. तर आयसीसी वर्ल्डकप २०१९ (ICC World Cup 2019) मध्ये विजेतेपद जिकंलेला इंग्लड संघ विजयी सलामी देण्यासाठी उत्सुक असणार आहे. तसेच इंग्लड संघासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे इंग्लड संघात बेन स्ट्रोक्स (Ben Strokes) जो रूट (Joe Root) जॉनी बेअरस्टो (Johnny Bairstow) परतल्यामुळे इंग्लड संघाची फलंदाजी भारतापेक्षा अधिक मजबूत दिसत आहे. तर २०२१ साली भारत आणि इंग्लड यांच्यात भारतात झालेल्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत भारताने इंग्लंडला २-१ असे पराभूत केले होते. आजच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा, शिखर धवन, जॉनी बेरस्टो आणि जो रूट हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com