ENG vs IND : भारत-इंग्लंड यांच्यातील अखेरचा कसोटी सामना रद्द!

ENG vs IND :  भारत-इंग्लंड यांच्यातील अखेरचा कसोटी सामना रद्द!

मुंबई | Mumbai

भारतीय संघ सध्या इंग्लंड (India vs England) दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील ४ सामने पार पडले असून पाहुणा भारतीय संघ २-१ ने मालिकेत आघाडीवर आहे. (Fifth Test between England and India cancelled)

यानंतर १० सप्टेंबरपासून अर्थातच आजपासून या सामन्यातील शेवटचा, पाचवा कसोटी सामना सुरू होणार होता. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम, मँचेस्टर (Manchester) येथे हा सामना रंगणार होता. तत्पूर्वी मँचेस्टरमधून एक वाईट बातमी पुढे येत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये करोनाचा शिरकाव झाल्यामुळे बीसीसीआय (BCCI) आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डानं (England Cricket Board) कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे ज्युनिअर फिजिओ योगेश परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. योगेश यांच्याआधी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. भारतीय संघाने कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन गुरुवारी सरावही रद्द केला होता. सर्व खेळाडू आपल्या खोल्यांमध्ये बंद आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com