
मुंबई | Mumbai
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेचा थरार आता निर्णायक वळणावर पोहोचला असून आज तिसरा टी २० सामना हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) खेळविण्यात येणार आहे. प्रेक्षकांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर बघता येणार आहे...
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात २०० धावांचा डोंगर उभारूनही भारताला सामना गमवावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या टी २० सामन्यात (T20 Match) भारताने जबरदस्त कमबॅक करत ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघाना मालिका विजयाची सामान संधी आहे. त्यातच भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Captain Rohit Sharma) ४६ धावांची निर्णायक खेळी करून आपणही फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाचा आजच्या सामन्यात विजय संपादन करून मायदेशात विंडीजविरुद्ध आणि इंग्लंडविरुद्ध टी २० मालिकेत विजयी लय कायम ठेवण्याचा इरादा असणार आहे. याशिवाय भारतात २०१९ मध्ये २ सामन्यांच्या टी २० मालिकेत ऑस्ट्रेलियाने अखेरचा मालिका विजय साकारला होता. तर नागपूर येथील दुसऱ्या टी २० सामन्यातील विजयाने फॉर्मात असलेला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आत्मविश्वासाने मैदानात उतरण्यासाठी सज्ज असणार आहे.
दरम्यान, आजच्या सामन्यात लोकेश राहुल (KL Rahul) विराट कोहली (Virat Kohali) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि सूर्यकुमार यादवकडून (Suryakumar Yadav) मोठी खेळी अपेक्षित असणार आहे. मागील २ सामन्यात अक्षर पटेल (Axar Patel) वगळता एकाही गोलंदाजाला आपल्या अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. त्यांना आज आपली कामगिरी उंचावण्याची संधी असणार आहे. तसेच आजच्या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, एरन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, हे स्टार प्लेअर्स असतील.
सलिल परांजपे, नाशिक