
ब्रेबॉर्न | Brabourne
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये सध्या ५ सामन्यांची टी २० मालिका सुरु आहे. मालिकेत पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने ३-१ अशी विजयी आघाडी संपादन केली आहे. आता मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी २० सामना आज मंगळवारी ब्रेबॉर्न क्रिकेट मैदानावर सायंकाळी ७ वाजता खेळवण्यात येणार आहे....
हा सामना जिंकून मालिकेतील आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी भारतीय महिला संघ आज मैदानात उतरणार आहे. तर आपली विजयी मोहीम कायम राखण्याचा ऑस्ट्रेलिया संघाचा मानस असणार आहे.
त्यामुळे मालिकेतील आपला दुसरा विजय संपादन करण्याचा भारतीय संघाचा इरादा असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये सध्या सुरु असलेल्या टी २० मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाज बेथ मुनीने २०० पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. भारताकडून शेफाली वर्माने १२७ धावा काढल्या आहेत.