भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत पात्र ठरणार का ?

भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत पात्र ठरणार का ?

अबुधाबी | Abudhabi

आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ (icc t20 world cup 2021) मध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान (India and Afghanistan) संघांमध्ये अबूधाबीच्या शेख झायद मैदानावर (Shaikh Zayad cricket stadium abudhabi) सामना होणार आहे. आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट विश्वचषकाच्या शर्यतीतून टीम इंडिया सलामीचे सामने गमावल्यामुळे अडचणीत आली आहे...

सलामी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्सने लाजिरवाणा पराभव पत्कारल्यानांतर न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर जबरदस्त पुनरागमन करेल असे वाटत होते.

मात्र न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाला उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्के करण्याची अखेरची संधी आहे.

टीम इंडियाला अफगाणिस्तान, स्कॉटलंड, नामिबियाविरुद्ध आपले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. शिवाय न्यूझीलंड अफगाणिस्तान संघाच्या उर्वरीत सामन्यातील पराभवासाठी टीम इंडियाला प्रार्थना करावी लागेल.

दोन्ही संघाच्या कामगिरीवर नजर टाकल्यास अफगाणिस्तान संघाची कामगिरी भारताच्या तुलनेत अधिक सरस आहे. सलामी सामन्यात स्कॉटलंड संघाला १३० धावांनी पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तान संघाला दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून

अनपेक्षित पराभव पत्कारावा लागला होता. हा पराभव मागे सारून अफगाणिस्तान संघाने नामिबियाला नमवून आपल्याला विजयी मोमेंटम पुन्हा मिळाला असल्याचे दाखवून दिले होते.

आता भारताला पराभूत करून स्पर्धेतील आपला तिसरा विजय नोंदवण्यासाठी अफगाणिस्तान काय रणनीती आखतो ? यावर सामन्याचा निकाल अवलंबून आहे. आयसीसी टी २० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारताने अफगाणिस्तान संघाला दोन्ही सामन्यात पराभूत केले होते. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी अफगाणिस्तान सज्ज आहे.

सलिल परांजपे नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com