ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

नाशिक | सलील परांजपे Nashik

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघांमध्ये १७ मार्चपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी (ODI series) भारतीय संघाची (Team India) नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांतील ४ सामन्यांची कसोटी मालिका आटोपल्यावर एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. भारतीय संघाचं कर्णधारपद (Captain of the Indian team) रोहित शर्माकडे (Rohit Sharma) असणार आहे. तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद असणार आहे. भारतीय संघात लीकेश राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा अक्षर पटेल यांचं पुनरागमन झाले आहे.

जयदेव उनाडकट भारतीय संघाचा भाग असणार आहे ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध मालिकेसाठी १८ सदस्सीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय विराट कोहली, शार्दूल ठाकूर संघात परतले आहेत. भारतात भारतीय संघाने २०२३ वर्षाच्या सुरुवातीला २ एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध (Sri Lanka and New Zealand) भारतीय संघाने मालिकाविजय साकारला आहे.

१९ फेब्रुवारी २०२३ रोजी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. तेज गोलंदाजीची (Fast bowling) भिस्त मोहंमद सिराज, मोहंमद शमी, उमरान मलिक आणि जयदेव उनाडकट यांच्यावर असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामने अनुक्रमे १७,१९,२२ मार्च रोजी मुंबई, विशाखापट्टणम आणि चेन्नई (Mumbai, Visakhapatnam and Chennai) येथे होतील.

सर्व सामने दुपारी २ वाजता खेळवण्यात येणार आहेत मात्र भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे मुंबई येथील सलामी सामन्यात खेळू शकणार नाही. हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) मुंबई येथील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेच्या सलामी सामन्यात कर्णधार असेल. रोहित शर्मा अखेरच्या २ सामन्यात संघात परतणार आहे.

भारतीय संघ रोहित शर्मा (Rohit Sharma), शुभमन गील, विराट कोहली (Virat Kohli), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, ईशान किशन, रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, युझवेन्द्र चहल, कुलदीप यादव, मोहंमद सिराज, मोहंमद शमी, उमरान मलिक आणि जयदेव उनाडकट.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com