VIDEO : T20 World Cup मध्ये भारतीय संघ खेळणार नव्या जर्सीत, पहिला लूक आला समोर

VIDEO : T20 World Cup मध्ये भारतीय संघ खेळणार नव्या जर्सीत, पहिला लूक आला समोर

मुंबई | Mumbai

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकसाठी काल 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

आगामी टी-20 विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करतान दिसणार आहे. तर, केएल राहुलकडं (KL Rahul) संघांच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. याशिवाय अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे.

त्यानंतर आता भारतीय संघाच्या जर्सीबाबतही महत्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय संघ टी-20 विश्वचषकात नव्या जर्सीत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत किट भागीदार ‘एमपीएल स्पोर्ट्स’नं एक व्हिडिओ शेअर केला आहे. एमपीएल स्पोर्ट्सने नव्या जर्सीचा पहिला लूक शेअर करताना लिहिले की, ‘तुम्ही आम्हाला चीयर करत नसाल तर खेळ खेळासारखा वाटत नाही.’

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सुर्यकुमार यादव, दिपक हुडा, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह आणि आर अश्विन. स्टॅंडबाय- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई आणि दिपक चहर.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com