...म्हणून भारत-श्रीलंका मालिका लांबणीवर

...म्हणून भारत-श्रीलंका मालिका लांबणीवर

कोलंबो | Colombo

श्रीलंका क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँड फ्लॉवर यांना कोरोनाची लागण (Sri Lanka's cricket batting coach Grant Flower tested covid positive) झाल्याचे निदर्शनास आले. यातून सावरत असतानाच आता कर्मचारी जी. टी. निरोशन (GT Niroshan) यांना कोरोनाची लागण झाली आहे...

काल हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका संघांमधील मालिकेला १७ जुलैपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील ३ वनडे सामने (ODIs) आता १७, १९, २१ जुलै रोजी खेळवण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे टी २० (T20) मालिकेतही बदल करण्यात आला आहे. हे सामने आता बदललेल्या वेळापत्रकानुसार २४,२५,२७ जुलै रोजी खेळवण्यात येतील. सर्व सामने कोलंबोच्या आर. प्रेमदासा मैदानावर (R. Premadasa Ground, Colombo) खेळवले जातील.

सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी टेन १,२,३,४ आणि सोनी सीक्स वाहिनीवर कारण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता तर टी २० सामने सायंकाळी ७:०० वाजता सुरु होणार आहेत .

भारत (India) आणि श्रीलंकेने (Sri Lanka) १९८४ पासून प्रत्येकी १ आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून, श्रीलंकेने आतापर्यंत भारताविरुद्ध एकूण १५९ सामने खेळले आहेत . श्रीलंकेने भारताविरुद्ध अखेरचा मालिका विजय १९९७ मध्ये संपादन केला होता.

२०१७ नंतर मात्र श्रीलंका क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. तसेच श्रीलंका क्रिकेट संघाने आपल्या संघाचे नेतृत्व आता दासून शनाका (Dasun Shanaka) याच्या खांदयावर सोपवलं आहे.

इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत कुशल मेंडिसच्या (Kusal Mendis) नेतृत्वात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर श्रीलंकेने हा निर्णय घेतला आहे.

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाचे शिलेदार १७ जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत नव्या दमाने उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. मनीष पांडे (Manish Pandey) आणि धवनला या मालिकेतून आपली कामगिरी सुधारण्यासाठी चांगली संधी चालून आली आहे.

या संधीचा फायदा उचलण्यासाठी धवन आणि मनीष पांडे सज्ज झाले आहेत . शिवाय येत्या १७ ऑक्टोबरपासून दुबईमध्ये टी २० विश्वचषकात भारतीय संघात आपलं स्थान मजबूत करण्यासाठी दोघांना समान संधी आहे.

भारतीय संघात पृथ्वी शॉ, देवदत्त पडिकल, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, वरुण चक्रवर्ती यांच्यासारखे युवा खेळाडू आहेत. आयपीएलमध्ये २०२० आणि २०२१ हंगामात या सर्व खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे.

आता टी २० विश्वचषकाच्या (T20 World Cup) अंतिम ११ खेळाडूंमध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी सर्व खेळाडू कशी कामगिरी करतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवाय भुवनेश्वर कुमार, युझवेन्द्र चहल, दीपक चाहर आणि नवदीप सैनी यांच्या कामगिरीवरही विशेष लक्ष असेल यात काही शंका नाही.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com