भारताला श्रीलंकेवर सर्वाधिक विजय मिळवण्याची संधी

भारताला श्रीलंकेवर सर्वाधिक विजय मिळवण्याची संधी

शिखर धवनाच्या नेतृत्वात श्रीलंका दौरा

कोलंबो | Colombo

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखालील युवा टीम इंडिया (Team India) श्रीलंकेच्या (Shreelanka) आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे.

या दौऱ्यात दोन्ही उभय संघांमध्ये ३ वनडे (India Tour Shreelanka) आणि ३ टी २० सामन्यांची मालिका होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohali या प्रमुख खेळाडूंशिवाय टीम इंडियाला मैदानात उतरावे लागणार आहे. शिवाय राहुल द्रविड ( Rahul Dravid) हे टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक असणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाला आपली कामगिरी उंचावण्याची संधी आहे.

भारतीय संघाला श्रीलंकेवर सर्वाधिक विजय संपादन करण्याची संधी आहे. भारतीय संघाने आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध ९१ सामने जिंकले आहेत. श्रीलंकेवर सर्वाधिक मात करणारा संघ बनण्यासाठी टीम इंडियाला २ विजय आवश्यक असणार आहेत.

पाकिस्तान (Team Pakistan) ९२ विजयांसह पहिल्या स्थानावर आहे. तर टीम इंडिया ९१ विजयांसह दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) ६१ विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दोन्ही संघांमधील मालिकेला ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनं (One Day Series) सुरुवात होणार आहे. हे सामने अनुक्रमे १३, १६, १८ जुलै रोजी होणार आहेत. तर ३ टी २० सामने २१, २३,२५ जुलै रोजी होतील. सर्व सामने कोलंबोच्या आर प्रेमदासा (R Premdasa Stadium) मैदानावर होतील.

टी २० सामने सायंकाळी ७ वाजता तर एकदिवसीय सामने दुपारी १:३० वाजता सुरु होतील. सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी टेन १,२,३,४ वाहिनीवर करण्यात येणार आहे.

- सलिल परांजपे, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com