शिखर धवनने सामन्यापूर्वी रचला इतिहास

भारत श्रीलंका सामन्याला सुरवात
शिखर धवनने सामन्यापूर्वी रचला इतिहास

मुंबई | Mumbai

श्रीलंकेचा (Shreelanka Team) टॉस जिंकून बॅटिंगचा (Batting) निर्णय घेतला अद्याप ३० षटके झाली असून १३४ वर चार विकेट श्रीलंकेने गमावल्या आहेत.

दरम्यान सामना सुरू होण्यापूर्वी च भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) इतिहास रचला आहे. शिखर धवनला पहिल्यांदा संघाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धवनने एक खास कीर्तिमान आपल्या नावावर केला असून भारतीय संघाचा सर्वात वृद्ध वनडे कर्णधार (Caption Of Team India) ठरला आहे.

कोलंबोच्या (Colombo) आर प्रेमदासा स्टेडियमवर (R Premdasa Stadium) भारत आणि श्रीलंका (Ind Vs SL) संघात तीन सामन्यांच्या वनडे सामन्यांचा थरार रंगणार आहे. शनाकाने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यातून सूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) आणि ईशान किशन (Ishan Kisan) यांना पदार्पणाची संधी मिळाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com